मित्रांनो व मैत्रीणिंनो आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनात कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सुट्टी घ्यावी लागते, मग ते कारण आजारी असल्याचे असू द्या, घरात लग्न असू द्या, घरात कोणी आजारी असू द्या, महिला असतील तर प्रसूती रजा असू द्या किंवा विद्यार्थी असतील तर शाळेतून सुट्टी असू द्या.
आज या ठिकाणी आपण किरकोळ रजा अर्ज कसा लिहायचा, sutti sathi arj in marathi त कसा लिहायचा, रजेचा अर्ज नमुना pdf आणि वैद्यकीय रजा अर्ज नमुना pdf पाहूया.
किरकोळ रजा अर्ज
रजेचा अर्ज
प्रति,
मा. व्यवस्थापक
———– कार्यालय पुसेगाव,
दि : / / 2023
विषय:- किरकोळ रजा मिळणेबाबत
अर्जदार:- विजय संतोष वाघमारे
महोदय,
वरील विषयास अनुसरून सविनय सादर करतो कि दिनांक———–रोजी महत्वाचे काम असल्यामुळे मी कार्यालयात हजर राहू शकत नाही. तरी मला दिनांक———–रोजी किरकोळ रजा मिळावी ही नम्र विनंती.
आपला/आपली नम्र
सही:- ———–
नाव:- ———–
शाळेत सुट्टीसाठी अर्ज नमूना
रजेचा अर्ज
प्रति,
मा. मुख्याध्यापक
———– विद्यालय कोरेगाव,
दि : / / 2023
विषय:- ४ दिवसांची सुट्टी मिळणेबाबत
अर्जदार:- विनय सुदर्शन लोखंडे
महोदय,
मी आपल्या विद्यालयात इयत्ता १० वी तुकडी अ च्या वर्गात शिकत असून माझा हजेरी क्रमांक १७ आहे. मी आजारी असल्यामुळे डॉक्टरांनी मला चार दिवस विश्रांती घेण्यास सांगितले आहे. पुढील चार दिवसात माझी प्रकृति पुन्हा पूर्ववत होईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे मला दिनांक————ते दिनांक———–पर्यंत सुट्टी मिळावी ही आपणास नम्र विनंती.
आपला/आपली नम्र
सही:- ———–
नाव:- ———–
महाविद्यालय सुट्टीसाठी अर्ज नमूना
रजेचा अर्ज
प्रति,
मा. प्राचार्य
———– महाविद्यालय सातारा,
दि : / / 2023
विषय:- ३ दिवसांची रजा मिळणेबाबत
अर्जदार:- प्रतिक विनोद माने
महोदय,
मी आपल्या महाविद्यालयात बी.ए. वर्ष २ मध्ये शिकत असून माझा रोल नंबर ९ आहे. मी दिनांक ३ सप्टेंबर ते दिनांक ५ सप्टेंबर पर्यंत माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे महाविद्यालयात हजर राहू शकणार नाही. तरी कृपया माझी रजा मंजूर करण्यात यावी.
आपला/आपली नम्र
सही:- ———–
नाव:- ———–
कंपनीत रजेसाठी अर्ज नमूना
रजेचा अर्ज
प्रति,
मा. व्यवस्थापक
सूर्या स्टिल pvt. ltd. बारामती,
दि : / / 2023
विषय:- २ दिवसाची रजा मिळणेबाबत
अर्जदार:- प्रणव विनायक खंदारे
आदरणीय सर/मॅडम,
मी आपल्या कंपनीत प्रॉडक्शन विभागात सीएनसी मशीन ऑपरेटर म्हणून काम करत आहे. मला माझ्या वैयक्तिक कामामुळे दिनांक———-ते दिनांक———-पर्यंत सुट्टी हवी आहे. हे दोन दिवस मी कामावर उपस्थित राहू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व.
आपला/आपली नम्र
सही:- ———–
नाव:- ———–