रासायनिक खते संपूर्ण माहिती pdf: वाढत जाणाऱ्या लोकसंख्या दिवसादवस अन्न धान्याचा तुटवडा पडत चालल्यामुळे, वाढत्या लोकसख्यचा अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी मानव रासायनिक खताकडे वळताना दिसत आहे.
रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादन जरी वाढत असले तरी त्याचे प्रत्यक्ष परिणाम मानवाच्या शरीरावर व जमिनीवर होत असलेला आपणास पाहायला मिळते.
रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतमालाची गुणवत्ता दिवसेंदिवस कमी होत चालेली आहे. शेतजमिनीचा कस कमी होत चालला आहे.
जल प्रदूषित होऊ लागले आहे. पाळीव जनावरांच्या शरीरावर घातक परिणाम होऊ लागले आहेत.
रासायनिक खतांचा वाढता वापर पाहता रासायनिक खतांचे प्रकार, वापर, दुष्परिणाम व फायदे यांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे बनले आहे.
रासायनिक खतांचे प्रकार, रासायनिक खतांची नावे
1. नत्रयुक्त खते
युरिया, अमोनियम सल्फेट
2. स्फुरद युक्त खते
सुपर फॉस्फेट, डायकॅल्शियम फॉस्फेट
3. पालाश युक्त खते
म्युरेट ऑफ पोटश, सल्फेट ऑफ पोटश
4. दुय्यम खते
चुना, गंधक, मॅग्नेशियम,
5. सूक्ष्म अन्नद्रव्ये
जस्त स्ल्फेट, मोरचूद, हिराकस, मॅगनीज स्ल्फेट, बोरॅक्स, अमोनियम मॉलिब्डेट