पोलीस स्टेशन तक्रार अर्ज नमुना मराठी pdf (Police Station Takrar Arj in Marathi Format)

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायची आहे पण त्यासाठी तुमच्या मातृभाषेत औपचारिक तक्रार अर्ज कसा लिहावा हे माहित नसेल.  

तुम्ही चोरी, छळ किंवा इतर कोणत्याही समस्येची तक्रार करत असलात तरी आम्ही या ठिकाणी दिलेला पोलीस स्टेशन तक्रार अर्ज नमुना मराठी pdf मध्ये तुमचा मार्गदर्शक ठरणार आहे.

खाली दिलेला फॉर्मट फ्रीमध्ये डाउन्लोड करा आणि तुम्हाला आवश्यक असलेली मदत मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनशी संपर्क साधा.

(हे पण डाऊनलोड करा: हनुमान चालीसा मराठी pdf)

Police Station Takrar Arj in Marathi Format

प्रति,
पोलीस निरीक्षक,
____________ पोलीस स्टेशन,
(पत्ता)

विषय: तक्रार अर्ज – ________________ संदर्भात

महोदय/महोदया,

मी _______________ (आपले पूर्ण नाव), राहणार _______________ (पत्ता), या अर्जाद्वारे खालीलप्रमाणे तक्रार नोंदवू इच्छितो/इच्छिते.

दिनांक ______________ रोजी, वेळ ______________ वाजता, ______________ (घटनास्थळ) येथे माझ्यासोबत खालीलप्रमाणे घटना घडली:

(घटनेचे संपूर्ण व नेमके वर्णन द्या – जसे की चोरी झाली, कोणी धमकी दिली, इ.)

या प्रकारामुळे मला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. कृपया याची दखल घेऊन संबंधित व्यक्ती/व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, ही विनंती.

मी या घटनेबाबत सत्य माहिती दिली असून, तिची सखोल चौकशी व्हावी, अशी अपेक्षा आहे.

आपला नम्र,
(आपले पूर्ण नाव)
स्वाक्षरी: _______________
पत्ता: ____________________
संपर्क क्रमांक: _______________
तारीख: _______________

पोलीस तक्रार अर्ज कसा लिहावा नमुना pdf

Leave a Comment