नोकरीच्या शोधात आहात पण नोकरीसाठी अर्ज कसा लिहायचा हे माहीत नाही, तर मग चला मित्रांनो आज आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये नोकरी साठी एक प्रभावी अर्ज (job application letter in marathi) कसा लिहायचा ते पाहूया.
नोकरीसाठी अर्ज लिहण्यापूर्वी तुम्ही स्वत: काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. त्या खालील प्रमाणे आहेत.
नोकरीसाठी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा
नोकरीसाठी जी जाहिरात दिलेली असते ती तुम्हाला काळजीपूर्वक वाचावी लागणार आहे, कारण त्यात कंपनीला नोकरीसाठी अर्ज करणार्या उमेदवारकडून नेमके काय हवे आहे, त्यांच्या गरजा काय आहेत हे समजले जाते.
कोणती पात्रता हवी आहे, किती वर्षाचा अनुभवी व्यक्ति हवा आहे, उमेदवाराचे शिक्षण किती अपेक्षित आहे, या सर्व बाबी समजतात यावरून तुम्ही स्वत:चे परीक्षण करू शकता व त्या जॉब साठी अर्ज करावा का नाही हे ठरवू शकता.
नोकरीच्या जाहिरातीवरून तुमच्याकडे त्यांना जो अपेक्षित अनुभव आहे तो तुम्ही अर्जामध्ये नमूद करू शकता व अनावश्यक गोष्टी अर्जामधून वगळू शकता.
कंपनीतील योग्य व्यक्तिला उद्देशून अर्ज लिहा
जाहिरातीत ज्या व्यक्तिला उद्देशून अर्ज लिहण्यास सांगितला आहे त्याच व्यक्तिला उद्देशून नोकरी अर्ज लिहावा, उदाहरणार्थ काही नोकरीच्या जाहिरातींमध्ये मॅनेजरला उद्देशून अर्ज लिहण्यास सांगितला जातो किंवा हेड ऑफ डिपार्टमेंटला, शाळा असेल तर प्राचार्यांना, संस्था असेल तर अध्यक्षांना उद्देशून अर्ज लिहण्यास सांगितला जातो, अशा वेळी त्याच व्यक्तीच्या नावे अर्ज लिहून सादर करावा.
आपले म्हणणे थोडक्यात मांडा
कंपनीचे मॅनेजर व भरती करणारे recruiters हे लोक नेहमी त्यांच्या कामात व्यस्त असतात त्यामुळे त्यांच्याकडे फार कमी वेळ असतो, अशावेळी अर्जात फक्त महत्वाच्या बाबींचा उल्लेख करावा.
ग्रामरच्या चुका टाळा
अर्ज लिहताना भाषेतील चुका टाळा, स्पेलिंग, वाक्यरचना, विरामचिन्हे यांचा योग्य ठिकाणी योग्य वापर करा. तसेच अर्ज पूर्ण लिहून झाल्यानंतर तो पुन्हा एकदा वाचून घ्या.
