गावातील कोणताही नागरिक ग्रामपंचायतीला सार्वजनिक, कौटुंबिक अथवा वैयक्तिक भेडसावणार्या अडचणीसंदर्भात अर्ज करू शकतो, ग्रामपंचायत कार्यालयात लेखी स्वरुपात अर्ज करू शकतो.
ग्रामपंचायत तक्रारीचे विषय
१. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठयाबाबत तक्रार अर्ज
२. सार्वजनिक किंवा मालकी जागेवर अतिक्रमण होत असल्यास तक्रार अर्ज
३. नवीन नळ जोडणीबाबत अर्ज
४. सार्वजनिक ठिकाणी कचरा, घाण साचल्यास तक्रार अर्ज
५. सार्वजनिक विजेच्या समस्येबाबत तक्रार अर्ज
६. भटकी जनावरे, कुत्री यांचा बंदोबस्त करण्याबाबत अर्ज
१. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठयाबाबत तक्रार अर्ज

अर्ज क्रमांक १
ग्रामपंचायत तक्रार अर्ज
दि : / / 2023
प्रति,
मा. ग्रामसेवक,
मु. पो. ———–,
जि. ———–, दि. ———–,
विषय:- नळास पाणी येत नसल्याबाबत
अर्जदार:- श्री/श्रीमती ———–
पत्ता:-
महोदय,
वरील विषयाला अनुसरून विनंती करतो/करिते कि, मी आपल्या ग्रामपंचायत हद्दीत वरील
पत्यावर राहत आहे. ग्रामपंचायत मार्फत आम्ही जे नळ कनेक्शन घेतले आहे त्या नळास गेल्या काही महिन्यांपासून खूप कमी दाबाने व फार कमी वेळेसाठी पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे आम्हाला दैनंदिन वापरासाठी फार कमी प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. तरी आपण सदर समस्या दूर करून सुरळीतपणे पाणी पुरवठा सुरू करावा ही आपणास नम्र विंनती.
आपला/आपली नम्र
सही:- ———–
नाव:- ———–
सूचना:
अर्ज क्रमांक १ प्रमाणे अर्ज लिहून ग्रामपंचायतीस सदर करता येतो, वरील अर्ज नमुन्यावरून अर्ज कसा लिहायचा हे तुमच्या लक्षात आले असेलच.
तुमच्या समस्येनुसार (तक्रारी नुसार) अर्जामध्ये बदल करून अर्ज तयार करू शकता. तुम्हाला फक्त अर्जाचा विषय बदलायचा आहे, आणि महोदय रकान्यात तुमच्या तक्रारीचे सविस्तर म्हणणे मांडायचे आहे, बाकी माहिती आहे तशी राहणार आहे.