बोनाफाईड अर्ज मराठी नमुना pdf
बोनाफाईड प्रमाणपत्र म्हणजे काय?
बोनाफाईड प्रमाणपत्र हे एक असे अधिकृत प्रमाणपत्र आहे जे शैक्षणिक संस्थाद्वारे इश्यू केले जाते. ज्यावरून संबधित व्यक्तिचा त्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश असल्याचे निश्चित होते.
जी शैक्षणिक संस्था हे प्रमाणपत्र देते तो विद्यार्थी त्या संस्थेचा विद्यार्थी असल्याचा ठाम पुरावा असतो.
बोनाफाईड प्रमाणपत्र कुठे आवश्यक असते?
शासकीय बस, रेल्वेचा प्रवासी पास काढण्यासाठी, बँकेत शैक्षणिक कर्ज मिळवण्याकरिता व इतर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकरिता बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक असते.
बोनाफाईड प्रमाणपत्र मिळवण्याकरिता कुठे अर्ज करावा लागतो?
बोनाफाईड प्रमाणपत्र मिळवण्याकरिता संबधित शाळेत किंवा महाविद्यालयात स्व हस्ताक्षरात अर्ज लिहून संस्थेच्या कार्यालयात द्यावा लागतो.
बोनाफाईड प्रमाणपत्र कोण देते?
बोनाफाईड प्रमाणपत्रासाठी शाळेच्या कार्यालयात अर्ज केल्यानंतर तो अर्ज शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्याकडे जातो, पुढे तो अर्ज मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये व्हेरिफाय केला जातो.
त्यानंतर शाळेकडे अगोदरच एक प्रिंटेड बोनाफाईड फॉर्म असतो त्यावर संस्थेचे क्लर्क विद्यार्थ्याची आवश्यक ती माहिती भरतात व पुढे तो अर्ज मुख्याध्यापक किंवा प्राचार्याकडे सहीसाठी पाठवतात. मुख्याध्यापक किंवा प्राचार्याची सही झाल्यानंतर तो अर्ज पुन्हा कार्यालयात येतो व संबधित अर्जदारास दिला जातो.