शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी कोण अर्ज करू शकतो?
शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी विद्यार्थ्याचे पालक अर्ज करू शकतात अथवा विद्यार्थी जर सज्ञान असेल तर तो स्वता अर्ज करू शकतो.
शाळा सोडल्याचा दाखला हे कोणते कागदपत्र आहे?
हा दाखला विद्यार्थी कोणती इयत्ता उत्तीर्ण किंवा अनूत्तीर्ण झाला आहे हे दर्शवते.
शाळा सोडल्याचा दाखला कशासाठी लागतो?
हा दाखला पुढील शिक्षणासाठी विद्यालयात/महाविद्यालयात/शाळेत किंवा इतर शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेण्याकरिता सादर करावा लागतो.
या दाखल्यावर काय नमूद केलेले असते?
या दाखल्यावर विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, जन्मतारीख, प्रवेश क्रमांक आणि शेवटचा वर्ग, शैक्षणिक कामगिरी, शाळा सोडण्याचं कारण, दाखला जारी करण्याची तारीख, मुख्याध्यापक स्वाक्षरी आणि शाळेचा शिक्का इत्यादि माहिती नमूद केलेली असते.
दाखल्यासाठी अर्ज कसा करावा?
शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी लेखी स्वरुपात शाळेतील मुख्याध्यापकास/प्राचार्यास अर्ज करावा लागतो.